संवाद....
एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मारवा राग ऐकला. त्यात स्वरांचा संवाद, सोबत येणारे शब्द व त्यातील भाव ह्यांचा संवाद खूपच सुंदर होता. रागात स्वरसंवाद खूप महत्वाचा असतो, तो रागाचे स्वरूप समोर उलगडत जातो. गायक स्वरासोबत येणारे शब्द व भाव ह्यांची अनुभूती घ्यायला एक संवाद स्थापित करतात. हा स्वरसंवाद समजला नाही, तर उत्तम कलाकार असतानाही, आवाजाचा पोत दर्जेदार असूनही, लय व ताल ह्यांचे गणित जमलेले असले तरीसुद्धा ती मैफील रंगत नाही. एक शिक्षक म्हणून आपणदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. अन्यथा शिक्षक त्या त्या विषयातील सखोल ज्ञानी असले, विषय रुचकर असला तरी तो तास भरकटू शकतो. एक उत्तम शिक्षक होण्यासाठी हा संवाद साधणे अनिवार्य आहे, नाही का? ३० ते ४० मिनिटांच्या अवधीमध्ये विषय सखोल असताना आणि धडा पूर्ण करण्याच्या घाईत असताना कसा बरे साधावा हा संवाद? बघा खालील युक्ती तुम्हाला उपयोगी ठरू शकतील. १. एखादी इंटरेस्टिंग बातमी घेऊन विषयात शिरता येते. २. आपल्याबाबत घडलेला एखादा किस्सा सांगता सांगता संवाद साधू शकतो. ३. आपल्याला भेडसावणारा प्रश्न विचार...