संवाद....
एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मारवा राग ऐकला. त्यात स्वरांचा संवाद, सोबत येणारे शब्द व त्यातील भाव ह्यांचा संवाद खूपच सुंदर होता.
रागात स्वरसंवाद खूप महत्वाचा असतो, तो रागाचे स्वरूप समोर उलगडत जातो. गायक स्वरासोबत येणारे शब्द व भाव ह्यांची अनुभूती घ्यायला एक संवाद स्थापित करतात. हा स्वरसंवाद समजला नाही, तर उत्तम कलाकार असतानाही, आवाजाचा पोत दर्जेदार असूनही, लय व ताल ह्यांचे गणित जमलेले असले तरीसुद्धा ती मैफील रंगत नाही.
एक शिक्षक म्हणून आपणदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. अन्यथा शिक्षक त्या त्या विषयातील सखोल ज्ञानी असले, विषय रुचकर असला तरी तो तास भरकटू शकतो. एक उत्तम शिक्षक होण्यासाठी हा संवाद साधणे अनिवार्य आहे, नाही का?
३० ते ४० मिनिटांच्या अवधीमध्ये विषय सखोल असताना आणि धडा पूर्ण करण्याच्या घाईत असताना कसा बरे साधावा हा संवाद?
बघा खालील युक्ती तुम्हाला उपयोगी ठरू शकतील.
१. एखादी इंटरेस्टिंग बातमी घेऊन विषयात शिरता येते.
२. आपल्याबाबत घडलेला एखादा किस्सा सांगता सांगता संवाद साधू शकतो.
३. आपल्याला भेडसावणारा प्रश्न विचारून विद्यार्थ्यांची मते मागता येऊ शकतात.
४. मागील तासात विद्यार्थ्यांनी केलेली एखादी चांगली गोष्ट आठवून त्याची दखल घेत कौतुक करत संवाद साधता येऊ शकतो.
५. मुलांच्या नावाने संबोधत त्यांची विचारपूस करू शकतो.
उत्तम संवाद साधता आला की आपले ज्ञान, विचार - ग्रहण करायला शिष्य देखील मनापासून तयार होतात.
संवाद हा आपला जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे, मग तो शिक्षक - विद्यार्थी नात्यात देखील तेवढाच महत्वाचा आहे!
बरोबर ना?
संवाद हा आपला जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे, मग तो शिक्षक - विद्यार्थी नात्यात देखील तेवढाच महत्वाचा आहे!
बरोबर ना?
प्राजक्ता सचिन भिडे
24 November 2024
#vikasitshikshak #vikasitbharat
24 November 2024
#vikasitshikshak #vikasitbharat
Comments
Post a Comment